उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या झाल्यानंतर सचिन वाझे यांचे नाव पुढे आले होते. मनसुख हिरेन यांचा तपास सचिन वाझे यांचेकडे होता. तसेच मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून त्यामागे सचिन वाझेंचा हात असल्याचा आरोप हिरेन यांच्या पत्नीने केला होता. त्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा ऊचलून धरत वाझे यांच्या निलंबनाची मागणी केली होती. मात्र वाझे यांची बदली करण्यात आली असून एटीएसकडे तपास सोपवण्यात आला आहे.
एटीएसने सचिन वाझे यांचे जवाब घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान सचिन वाझे यांनी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले होते. ज्यामध्ये आता जगाला निरोप देण्याची वेळ आलीय असा ऊल्लेख केला होता. त्यामुळे वाझेंच्या त्या पोस्टमुळे सर्वत्र खळबळ ऊडाली आहे.
३ मार्च २००३ ला मला सीअायडीच्या अधिकार्यांनी अटक केली होती. परंतू त्या प्रकरणात काहीही निष्पन्न झाले नाही. आता त्या ईतिहासाचीच पुनरावृत्ती होतांना दिसते आहे. माझे कही सहकारीच मला अडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. १७ वर्ष माझ्याकडे संयम होता, अपेक्षा होती, जगण्याची ऊमेद होती. परंतू आता ती १७ वर्षे नाहीत, त्यामुळे आता जगाला निरोप देण्याची वेळ आलीय असे त्यांनी अापल्या पोस्टमध्ये लिहीले आहे. सचिन वाझेंच्या या पोस्टमुळे सर्वत्र चर्चेला ऊधाण आले आहे.
ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात सचिन वाझेंनी अटकपुर्व जामीनाचा अर्जसुद्धा सादर केला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला असून एटीएसला आपले म्हणने मांडण्यास सांगीतले आहे. यावरील पुढील सुनावणी १९ मार्च रोजी होणार आहे.