कंगना रनौत ट्वीटरवर नेहमी कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. यावेळी तिने थेट ट्विटरच्या CEO वर निशाणा साधला आहे. अमेरिकी संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिने भाष्य केलं आहे.
ट्विटरच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीवर किंवा व्यवस्थेवर निशाणा साधण्याची ही कंगनाची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने अनेकांना ट्रोल केलं आहे. तर ट्विटरविरोधातही तिने अनेकदा आपला राग व्यक्त केला आहे. यापूर्वी ट्विटरने अनेकदा कंगनाच्या ट्विटवर कारवाई केली होती. त्यामुळे तिने हा राग व्यक्त केल्याचं अनेकजण म्हणत आहेत.
कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये जॅक डोर्सीचं 2015 साली केलेल्या एका ट्वीटला क्वोट केलं आहे. ‘तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा देत नाहीत, इस्लामिक देशांनी आणि चिनी प्रोपगंडासोबत तुम्ही पूर्णपणे विकले गेले आहात. तुम्ही फक्त आपल्या फायद्याच्या बाजूने उभे आहात. तुम्ही इतरांच्या मतांबद्दल असहिष्णुता दर्शवत आहात. तुम्ही तुमच्या लोभांचे गुलाम झाले आहात. त्यामुळं केवळ मोठं मोठे दावे करू नका, हे खूप लज्जास्पद आहे.
या प्रकरणात अनेकजण कंगनाशी सहमत आहेत, तर अनेकांनी कंगानाला ट्रोल केलं आहे.कंगना रणौतने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी वर आपला राग काढला आहे.