आत्ता तर कंगनाची थेट महात्मा गांधींवर टीका

14

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ट्विटमुळे अनेकदा अडचणीत आली आहे. आता पुन्हा एकदा कंगनाने एक ट्विट करून तिच्या अडचणीत वाढ करून घेतली आहे. यावेळी कंगनाने थेट भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर टीका केली आहे.

महात्मा गांधी आपल्या पत्नीला घराबाहेर शौचालयाला जाण्यापासून नकार देण्यासाठी घराबाहेर काढायचे. ते एक महान नेता होते, मात्र ते महान पती नव्हते, ‘ असं एका युजरच्या ट्विटला कंगणाने उत्तर दिले आहे. 

कंगणा राणावतने राणी एलिजाबेथ यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं. ज्यात ती म्हणाली की, जगावर राज्य करणारी महिला शासक म्हणून एकाचं व्यक्तीचं नाव घेतलं जातं.त्या आदर्श पत्नी आणि बहीण होऊ शकल्या नाहीत. मात्र त्या एक महान राणी आहेत, असं कंगणा राणावत म्हणाली. 

महात्मा गांधींवर त्यांच्या मुलांनी वाईट आई-वडील असल्याचा आरोप केला होता, असं कंगणा राणावतने ट्विट केले आहे.यामुळे आता कंगनाच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.