औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून येत आमदार सतीश चव्हाण यांनी विक्रम केला आहे. आता त्यांना किंवा मला मंत्री करा अशी जाहीर मागणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. एमजीएम विद्यापीठातील रुख्मिणी सभागृहात सतीश चव्हाण यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते.
पदवीधर मतदार संघ किंवा शिक्षक मतदार संघ या दोन्ही मतदारसंघात मतदारांची मने जिंकने सोपे नाही. असे असूनही मी असो किंवा सतीश चव्हाण आम्ही मतदारांपर्यंत जात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली आहे. सतीश चव्हाण यांनी तर विजयाची हॅट्रीक करत विक्रमी मताधिक्याने विधान परिषदेत प्रवेश केला आहे.
आमच्या मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रीपद दिल्यास समस्या सोडवायला मदत होईल अशी मागणीच आ. विक्रम काळे यांनी केला. सतीश चव्हाण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्यामुळे त्यांना तरी मंत्री करा. मी मागे हटण्यास तयार असल्याचं विक्रम काळे म्हणाले.