आता गरीब मराठ्यांनी आपलं अस्तित्व दाखवलं पाहिजे : प्रकाश आंबेडकर

22

मराठा समाजाला आरक्षण देण्यात भाजप आणि महाविकास आघाडी सरकार कमी पडलं. राज्यातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांमध्ये बसणारे आरक्षण राज्य सरकारनं आणायला हवं, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली आहे.

आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारकडून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे आता मराठा आरक्षणावर फुलस्टॉप लागल्याचंही आंबेडकर म्हणाले. आता गरीब मराठ्यांनी आपलं अस्तित्व दाखवलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील मराठा नेत्यांनी गरीब मराठा समाजावर अन्याय केलाय, असा आरोपही आंबेडकरांनी केला आहे.