…आता चक्क रोडरोलरद्वारे कोरोनाविरुध्द जनजागृती

13

परभणीमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर परभणी येथील महानगरपालिका सदस्य विशाल मनोहरराव बुधवंत यांनी काल दुपारी रोडरोलरद्वारे कोरोनाच्या महामारीबाबत सर्वसामान्य जनतेत जनजागृतीचे प्रयत्न केले.

बुधवंत यांनी स्वतःच्या रोडरोलरवर दोन्ही बाजूंनी होर्डींग झळकवून ‘मित्रहो, अत्यंत महामारी कोरोनामधून मी वाचून आलो आहे. त्यामुळे कृपया तुम्हाला हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, स्वतःला आपल्या परिवाराला तसेच आपल्या समाजाला या कोरोनापासून वाचवा, ही नम्र व कळकळीची विनंती करतो, या आशयाचा संदेश दिला.’

तसेच कोरोना म्हणजे मृत्यूला आमंत्रण या हेडींगद्वारेही सर्वसामान्य नागरीकांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कोरोनाचा वाढता प्रभाव चिंताजनक आहे. त्यात असे निराळ्या पद्धतीने प्रबोधन हे काहीस सकारात्मक असल्याचं पाहायला मिळत आहे.