आत्ता पुणेकरांना भरावा लागणार सुट्टी दिवशीही मिळकत कर

14

नागरिकांच्या सोयीसाठी ३१ मार्चपर्यंत सुटीच्या दिवशीही कर भरणा कार्यालये सुरू राहणार असल्याचे पुणे महापालिकेने कळविले आहे.

मिळकत कर भरण्यासाठी शहरातील सर्व नागरी सुविधा केंद्रे सोमवार ते शनिवारी सकाळी दहा ते दुपारी चार दरम्यान सुरू राहणार असून रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे महापालिकेने स्‍पष्ट केले आहे.

महापालिकेच्या तिजोरीत ५ मार्चअखेर मिळकत करापोटी १४३८ कोटी ९३ लाखांची रक्कम जमा झाली आहे. त्यातील सुमारे ५० टक्के रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा झाली आहे.

मिळकत कराचा भरणा न करणाऱ्या ४३७ मिळकतींवर जप्तीची कारवाई महापालिकेने केली आहे. त्यातील ११६ मिळकतदारांनी १३ कोटी ६८ लाख २८ हजार ३७३ रुपयांची थकबाकी भरल्यामुळे त्यातील ११६ मिळकती सीलमुक्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहमहापालिका आयुक्त आणि मिळकत कर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.