प्रचार आणि प्रसार यांसाठी सोशल मिडिया हे सर्वात ऊत्तम माध्यम बनले आहे. राजकारणात या सोशल मिडियाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सोशल मिडियाच्या सहाय्याने अनेक व्यवसायिकांनी आपले व्यवसाय मोठे केले आहे. कमी क्षणांत जास्तीजास्त जनसंपर्क करण्याचे हे माध्यम आणि याचे महत्व लक्षात घेऊन भाजपने अायटी सेलची स्थापना केली होती. ज्याद्वारे भाजपच्या विचारधारा, कार्यक्रम, योजना आणि विरोधकांना ट्रोल करणे या गोष्टी केल्या जातात. या पार्श्वभूमिवर आता कॉंग्रेसनेदेखील यामध्ये नव्याने पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. ‘कॉंग्रेस सोशल मिडिया वॉरीयर्स” या नावाने कॉंग्रेस एक नविन गट तयार करणार आहे ज्याच्या सहाय्याने ते भाजपाच्या टीकांना प्रत्युत्तर देण्यासोबत आगामी काळातील कॉंग्रेसचे ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करणार आहे. त्यामुळे आता भाजप आयटी सेल विरुद्ध कॉंग्रेस सोशल मिडिया वॉरीयर्स असे चित्र समाजमाध्यमांवर बघायला मिळणार आहे.
ईंडिया टुडे वृत्तवाहिनीने यासंबंद्धिची बातमी दिली आहे. सतत होणारा पराभव आणि कमी झालेला जनसंपर्क यावर सोशल मिडयामुळे परिणाम होणार आहे. कॉंग्रेसला संघटनात्मकरित्या नव्याने ऊभारी देण्यासाठीसुद्धा या सोशल मिडिया वॉरीयर्सचा ऊपयोग होणार आहे.
कॉंग्रेस याकरिता पाच सदस्यीय समिती नेमणार आहे. त्यानंतर संपूर्ण देशभरात पाच लाख कर्मचार्यांची या कक्षात भरती करण्यात येणार आहे. याद्वारे कॉंग्रेसच्या ध्येयधोरणांना भारताच्या कानाकोपर्यात पोहचण्यात तसेच जमिनीवरील संघटनेत बळकटी निर्माण करण्यात मदत होणार आहे. सुरुवातीला या सेलमध्ये सहभागी होण्यार्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यातील गुणांची पारख करुन त्यांची निवड करण्यात येणार आहे. एक हेल्पलाईन नंबरसुद्धा जारी करण्यात येणार आहे. ज्यांना या कक्षामध्ये सहभागी होण्याची ईच्छा आहे त्यांना हेल्पलाईन नंबरवर संपर्क करायचा आहे.
सततच्या पराभवामुळे कॉंग्रेसचे जमिनीवरील संघटन कमकुवत झाले आहे. अलिकडे कॉंग्रेसमध्ये अनेक मोठे बदल करण्यात येत आहे. आगामी काळात येणार्या विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेस संघटनात्मक बदल करुन मोर्चेबांधणी करत आहे. यामध्ये कॉंग्रेस सोशल मिडिया वॉरीयर्सचा चांगलाच ऊपयोग होणार आहे. वॉरीयर्स या नावाचा ऊल्लेख जाणिवपूर्वक करण्यात आला आहे. भाजपाच्या आयटी सेलवरून अनेकदा खोट्या(फेक) गोष्टींचा प्रसार केला जातो. कॉंग्रेस मिडिया वॉरीयर्सकडून या खोट्या गोष्टींना ऊघडे पाडून भाजपचा खरा चेहरा समोर आणण्याचे कामसुद्धा होणार असल्याचे कॉंग्रेस सोशल मिडियातील एका मोठ्या अधिकार्याने नाव न घेण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.