आता दोन मास्क वापरायला हवेत : अजित पवारांचे आवाहन

69

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनीच मास्कबाबत कमालीची काळजी घ्यायला हवी. आता दोन मास्क वापरायला हवेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

बारामतीत प्रशासन व सेवाभावी संस्थांच्या वतीने रुग्णांच्या सोयीसाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत, ऑक्सिजन व व्हेंटीलेटरसह बेड्स वाढविण्याचा प्रयत्न केला जातोय.डॉ. सुनिल पवार यांच्या सहकार्याने सातव कुटुंबियांनी हा एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या ठिकाणी व्हेंटीलेटर व ऑक्सिजनची सुविधाही दिली जाणार असल्याने बारामतीकरांची चांगली सोय होणार आहे.

बारामतीतील डॉ. सुनिल पवार व सातव कुटुंबियांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या धो. आ. सातव कोविड हॉस्पिटलचे ऑनलाईन उद्घाटन आज पवार यांनी केले, त्या प्रसंगी बोलताना त्यांनी हे आवाहन केले.

यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, डॉ. सदानंद काळे, डॉ. मनोज खोमणे, संभाजी होळकर, रोहित कोकरे आदी उपस्थित होते.