ईंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. यावरुनच आता कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. अनेक राज्यांत अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. पेट्रोल पंपावर बील देतांना मोदी सरकारद्वारे करण्यात आलेला महागाईचा विकास आपल्याला दिसेल. कर वसुली आणि महागाईच्या लाटा आता सातत्याने येत जात राहणार आहे. अशा आशयाचे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.
महाराष्ट्रातसुद्धा ईंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसने रस्त्यावर ऊतरली आहे. कॉंग्रेसच्यावतीने अनेकठिकाणी ईंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात येत असून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अगोदरच सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. आता देशात रुग्णसंखेच्या प्रमाण कमी होत असल्यामुळे काही राज्ये अनलॉक होणार आहे. पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत सुरु होण्याच्या मार्गावर असतांना झालेली ईंधनवाढ सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय ठरते अाहे.