दिल्लीत नवी संसद भवनाचे काम जोरात सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेते अतुल भातखळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असे ऐकले होते. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच”, असे ट्विट करत रोहित पवार यांनी म्हटले आहे.
नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल रोहित पवार यांनी केला होता. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.