कोरोना विषाणूविरुध्दच्या लढाईत कोरोनायोद्ध्या म्हणून लढणार्या परभणीतील विविध शासकीय रुग्णालयातील परिचारिकांना परिचारिका दिनाचे औचित्य साधून कोकण विद्यापिठ कार्यकारी परिषदेचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देशमुख यांनी प्रत्येक एक डझन रत्नागिरी हापूस आंबा वितरीत करीत परिचारीकांच्या कार्यास सलाम केला.
जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून देशमुख यांनी महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर, आरोग्य केंद्रांवरील आशा वर्कर्स, परिचारिका व अन्य कर्मचारी यांच्या भेटी घेतल्या व जवळपास 100 डझन रत्नागिरी हापूस आंबा भेट दिला.
तसेच या कोरोना योद्ध्यांच्या कामाचे कौतूक केले. आपला भाऊ म्हणून सदैव पाठीशी उभे राहू, असे आश्वासनही दिले. यावेळी नगरसेवक नंदू दरक, रितेश जैन, दिक्षित, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती देऊळकर यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.