दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या परिचारिका संपावर, रुग्णालयातील सेवा ठप्प

23

कोरोना संकटाने देशात धुमाकूळ घातलेला असतानाचं सर्वात मोठे रुग्णालय असणाऱ्या दिल्लीतील एम्स रुग्णालयातील परिचारिका (नर्स) बेमुदत संपावर गेल्या आहेत. या कारणाने रुग्णांचे खूप हाल होत आहेत. इतर राज्यांतुन रुग्ण येत आहेत परंतु या बेमुदत संपामुळे त्यांना रुग्णालयात घेतले जात नाही. रुग्णालयात असलेल्या इतर रुग्णांचे देखील नर्स नसल्यामुळे हाल होत आहेत. या संपामुळे रुग्णालयास मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नर्सअभावी रुग्णांवर उपचार करता येत नाहीत.

परिचारिकानी (नर्स) हा संप सहाव्या वेतन आयोगाच्या तरतूदी लागू कराव्यात आणि कंत्राटी पद्धतीने भरती बंद करावी, यासाठी केला आहे. यासह इतर मागण्यांसाठी देखील त्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. पाच हजार परिचारिका संपावर आहेत. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी पारिचारिकांनी अचानक पुकारलेल्या बेमुदत संपाने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे परिचारिकांनी संप मागे घेत कामावर लवकर हजर व्हावे, असे व्हिडीओ मेसेजद्वारे आवाहन केले आहे.

एम्स हे देशातील सर्वात मोठे रुग्णालय असून या रुग्णालयात उपचारासाठी इतर राज्यातून रुग्ण येतात. परिचारिका नसल्याने यकृताचे आजार, कर्करोग, हृदयरोग, मोठ्या शस्त्रक्रियांसाठी आलेल्या रुग्णांवर देखील उपचार करणे कठीण होत आहे. परिचारिकांच्या संपामुळे इतर राज्यातून आलेल्या रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे देखील हाल होत आहेत.