महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या महान व्यक्तींनी शेतकऱ्यांना न्याय आणि महिलांना शिक्षण हे मिशन सुरू केलं होतं. ते अद्याही पूर्ण झालेलं नाही. अस काल महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून जनतेला संबोधित करताना म्हणाले.
महात्मा फुले हे सदैव शेतकऱ्यांना न्याय आणि महिलांना शिक्षण देण्यासाठी झटले. त्यांनी सुरू केलेल मिशन आपण पूर्ण करू अशी हमी त्यांनी दिली. यावेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर,पुणे प्रभारी गणेश बिडकर,आमदार मुक्ताई टिळक,माधुरीताई मिसाळ, भाजप पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर ,पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते .
महात्मा फुले यांनी दाखवलेली दिशा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू हीच त्यांना खरी आदरांजली असेल.शेतकरी सुखी झाल्याशिवाय देश सुखी होणार नाही .हे महात्मा फुले यांचे धोरण होते .आणि हेच धोरण कायम लक्षात ठेवून आपण कार्य करू .असे चंद्रकांत दादा पाटील जनतेशी बोलताना म्हणाले .