महाराष्ट्राच्या वतीनं मी भीक मागतो, की आपण ऑक्सिजनचा पुरवठा करा : जितेंद्र आव्हाड 

81

राज्यात सध्या लागणारा ऑक्सिजन आणि उपलब्ध ऑक्सिजन यात मोठी तफावत आहे. त्यात वाढती रुग्णसंख्या पाहता आगामी काही दिवसांत ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट केलं आहे. राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा म्हणून राज्य सरकार वारंवार विनंती करत आहे. 

तसेच त्यांनी नुकतंच एक अत्यंत भावनिक असं ट्विट करत पंतप्रधानांकडे राज्याला ऑक्सिजन पुरवण्याची मागणी केली आहे.जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या वतीनं मी भीक मागतो, की आपण ऑक्सिजनचा पुरवठा करा.