शिवस्वराज्यदिनी भगव्या ध्वजाच्या ध्वजारोहणास एड. सदावर्तेंचा विरोध

19

यंदाच्या स्वराज्यभिषेकदिनापासून ६ जुन रोजी शिवस्वराज्यदिन साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने दिला आहे. याअंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांवर भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन हा शिवस्वराज्यदिन साजरा करण्याचे आदेश सरकारतर्फे सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात येणार आहे.

मात्र सरकारच्या या निर्णयावर एड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला असून, शासकीय कार्यालयांवर भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यास विरोध दर्शवला आहे. सदावर्ते यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून असे करणे देशातील सार्वभौमिकता आणि अखंडत्वास धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

सदावर्ते यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय संविधान आणि राष्ट्रीध्वज संहिता २००२-२००६ नुसार शासकीय कार्यालयांवर केवळ राष्ट्रध्वज फडकवण्य‍ाची मुभा आहे. शिवस्वराज्यदिनी शासकीय कार्यालयांवर भगवा ध्वज फडकवल्यास ऊद्या कुणिही येऊन, मोगलांचा झेंडा फडकवा, निजामांचा फडकवा, पेशव्यांचा फडकवा कुंवा सम्राट अशोकाचा फडकवा असे म्हणू शकतो.

राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सदावर्तेंना प्रत्युत्तर देत सदावर्तेंना भाजपची फुस असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रात शिवस्वराज्यदिन रोखण्याची कुणाची ताकद आहे? असेसुद्धा ते यावेळी म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांनी यावर ठोस निर्णय घ्यावा अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा ईशारासुद्धा सदावर्ते यांनी दिला आहे.