23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून समर्पित करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्यांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीत आंदोलन सुरू आहे. सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. या आंदोलनादरम्यानच आज राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक ट्विट केले आहे.
अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो. असे त्यांनी लिहले आहे.
आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो”, असे ट्विट करत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका देखील केली आहे.
हे आंदोलन गांभीर्याने घेण्याची गरज आहे. दुर्दैवाने केंद्रातील भाजपा सरकारने हे आंदोलन तेवढे गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. पंजाब आणि हरयाणामधील शेतकरी देशाची अन्नाची गरज भागवितात. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे”, असा सल्ला त्यांनी दिला होता.