पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने सामान्यांचे एकंदरित महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
फेब्रुवारी महिन्यात देखील कमर्शिअल गॅसच्या किंमतीत 190 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर दिल्लीमध्ये या 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत 1533.00 रुपये प्रति सिलेंडर तर मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये दर 1482.50 रुपये, 1598.50 रुपये आणि 1649.00 रुपये आहेत.
कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. यानंतर सबसिडी नसणाऱ्या 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची दिल्लीतील किंमत 794 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.
सामान्यांना महागाईमुळे या महिन्यात आणखी एक फटका सहन करावा लागणार आहे. हे नवीन दर 25 फेब्रुवारीपासून अर्थात आजपासून लागू होत आहेत.