काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजीनं डोकं काढलं वर

71

राजस्थानात काँग्रेस सरकार येऊन अडीच वर्ष झाली. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाच्या नियुक्त्या झाल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं सरकार आलं आहे. 

राजस्थानच्या सत्ताधारी काँग्रेस पार्टीत पुन्हा एकदा गटबाजीनं डोकं वर काढलं आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या समर्थकांनी त्यांचा हक्क परत मागितला आहे.

जुलै महिन्यात राजस्थानमध्ये राजकीय वातावरण पेटलं होतं. सचिन पायलट यांनी समर्थक आमदारांसह अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंड पुकारलं होतं. त्यानंतर काँग्रेस हायकमांडच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण शांत झालं. पायलट आणि गेहलोत यांच्यातील वाद संपवण्यासाठी एक कमिटी बनवली. परंतु या कमिटीच्या शिफारशींवर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. 

सचिन पायलट यांच्यासोबत समर्थक आमदारांना मंत्रिमंडळ विस्तार आणि पक्षातील पदांसाठी आवाज उठवला आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची मानसिकता नाही.