कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याकारणांमुळे राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्यातील कंटेंन्मेंट झोन मध्ये हा लॉकडाऊन असणार आहे. दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
राज्यात मिशन बिगिन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्य सचिव संजय पुमार यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालायकडून बुधवारी देण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक असणे, सामाजिक अंतर राखणे, सतत हात धुणे, चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी, जलतरण तलावात एकावेळी एकच खेळाडू, धार्मिक कार्यक्रम, खेळ यासाठी मोकळ्या मैदानात २०० जणांना परवानगी, बंद मोठया सभागृहात १०० जणांना परवानगी इत्यादी केंद्र गृहमंत्रालायकडून मार्गदर्शक सूचना जरी करण्यात आल्या आहेत.बतसेच कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावे असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे .