नविन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सिमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहे. अांदोलनाचे पडसाद भारतभरातच नाही तर संपूर्ण जगात ऊमटत असल्याचे चित्र आहे. नुकतेच प्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने सीएनएन वृत्तवाहिनिच्या शेतकरी आंदोलनासंबंद्धिच्या बातमीचा आधार घेत “अापण यावर बोलत का नाही” अशा टॅगलाईनचे ट्वीट केले आहे. रिहानाच्या या ट्वीटनंतर जगभरातून शेतकरी अांदोलनास पाठींबा देत असल्याचा वर्षाव समाजमाध्यमांवर होतांना दिसतो आहे. रिहानापाठोपाठ पर्यावरणवादी नेता म्हणून अोळखली जाणारी ग्रीटा थनबर्ग हीनेदेखील शेतकरी अंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे. कमला हॅरीस यांची भाची मीना हॅरीस यांनीदेखील यावर ट्वीट करत आपली भूमिका मांडली आहे.
रिहाना या प्रसिद्ध पॉपस्टार आहेत. जगातील सर्वात श्रीमंत संगीतकारांच्या यादीत रिहानाचे नाव आहे. प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली सिमा आणि पंजाबच्या काही भागातील ईंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. यासंबंद्धिचे वृत्त सीएनएन वाहिनीने प्रसारीत केले. या बातमीचा आधार घेतच रिहानाने आपण यावर बोललि पाहिजे असे ट्वीट केले आहे. मीना हॅरीस यांनी अमेरिकेतील कॅपीटल हिलवर झालेला हल्ला आणि भारतातील शेतकरी अंदोलनावर करण्यात येणारी दडपशाही याचा एकमेकांशी संबंद्ध असल्याचे म्हटले आहे. हा काही योगायोग नव्हे आपण यावर बोलले पाहिजे असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. पर्यावरणवादी नेता म्हणन अोळख असणार्या ग्रीटा थनबर्गनेसुद्धा आंदोलनास पाठींबा दिला आहे.
शेतकरी दिल्ली सिमेवर दाखल झाल्यापासून विविध देशातील भारतीयांकडून शेतकर्यांचे समर्थन करण्यात आले होते. कॅनडाच्या पंतप्रधानांनीसुद्धा शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काही विधाने केली होती, ज्यावरुन ते वादाच्या भोवर्यातसुद्धा सापडले होते.