…पुन्हा एकदा ४३ अ‍ॅप्सवर केंद्र सरकारची बंदी

2

केंद्र सरकारनं पुन्हा काही अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी चिनी ॲप वर सरकारने बंदी घातली होती. माहिती तंत्रज्ञान कायच्याच्या ६९ ए अंतर्गत केंद्र सरकारनं ४३ अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई केली आहे. अली एक्स्प्रेस, स्नॅक व्हिडीओ अशा लोकप्रिय अ‍ॅपचा बंदिमध्ये समावेश आहे. सुरक्षेच्या कारण देत केंद्र सरकारनं या अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई केल्याचं म्हटलं जातंय.

अली सप्लायर्स मोबाईल अ‍ॅप, अलिबाबा वर्कबेंच, अली एक्सप्रेस, अलिपा कॅशिअर, लालामूव इंडिया, ड्राईव्ह विथ लालामोव इंडिया, स्नॅक व्हिडिओ, कॅमकार्ड-बिझिनेस कार्ड रिडर, कॅम कार्ड- बीसीआर वेस्टर्न, साऊल, चायनजी सोशल, आशियन डेट, फ्लर्ट विश, गायज ओनली डेटिंग, टूबिट, वी वर्क चायना, फर्स्ट लव लाईव्ह, रिला, कॅशिअर वॉलेट, मँगो टीव्ही, एमजीटीव्ही, वी टीव्ही, वीटीव्ही लाइट, लकी लाईव्ह, टाओबाओ लाईव्ह, डिंग टॉक, आईडेंटिटी वी, आयसोलँड २, बॉक्स स्टार, हॅपी फिश, जेलीपॉप मॅच, मंचकिन मॅच, कॉनक्विस्टा ऑनलाइन ह्या अ‍ॅपचा यामध्ये समावेश आहे. यापूर्वीही सरकारनं चिनी अ‍ॅप्सवर डिजिटल स्ट्राईक केला होता. टिकटॉकसह ५९ अ‍ॅप्सवर सरकारनं बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा सरकारनं काही अ‍ॅप्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

बंदी घातलेले अ‍ॅप्स भारताचं सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात असल्याची माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलंय. गृह मंत्रालय आणि सायबर कॉर्डिनेशन सेंटरद्वारे मिळालेल्या अहवालानंतर सरकरानं कारवाई केली.