पुण्यात बँकांच्या ‘सीएसआर’ निधीतील कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झाला. एकजण म्हणतो, ”मी पुन्हा येईन”, दुसरा म्हणतो, ”मी परत जाईन” पण तुम्हाला बोलवलं कुणी होतं? अशा शब्दात सणसणीत टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना लगवाला.
विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या ‘सीएसआर’ फंडातून ‘कोविड-१९’च्या लढाईसाठी केलेल्या कामांचे उद्घाटन तसेच विविध उपकरणांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाबत विचारले ते म्हणाले, ”इंग्लंडमध्ये कोरोनाचा तिसरा प्रकार सापडला आहे, ख्रिसमसलाही लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे.पुण्यात विधानभवन येथे त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
खुद्द चंद्रकांत पाटील यांनीच ”मी कोल्हापूरला परत जाणार”, असे जाहीर कार्यक्रमात काल स्पष्ट केले. यावरुन चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडियावर ट्रोल केले जाते.याबाबत अजित पवार यांना विचारले असता, ‘एकजण म्हणतो, ”मी पुन्हा येईन”, दुसरा म्हणतो, ”मी परत जाईन. तुम्हाला 5 वर्षा करता निवडून दिले होते. आता कुणी त्यांच्याकडे काम घेऊन गेलं तर, म्हणतील,”मी तर परत चाललो. तुम्हाला बोलवलं कुणी होतं? मी मात्र पुन्हा येईन असंही म्हणत नाही आणि परत जाईन असंही म्हणणार नाही”,अशी सणसणाटी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.