२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सत्तेत अाल्यास शिवभोजन थाळी सुरु करण्याचे आश्वास शिवसेनेच्यावतीने देण्यात आले होते. निवडणुकांनतर पार पडलेल्या सत्तानाट्यांनंतर राज्या महाविकासआघाडीची सत्ता आली. ज्यामध्ये शिवसेनेची महत्वाची भूमिका आहे. सत्तेत आल्यानंतर शिवसेनेने दिलेले आश्वासन पूर्ण करीत राज्यात जागोजागी शिवभोजन केंद्रे ऊभारले. या शिवभोजन थाळीस २६ जानेवारीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या ऑफीशीयल ट्वीटवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी प्रजासत्ताकदिनी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. वर्षभरात ३ कोटींहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. वर्षभरात संपूर्ण राज्यात विविधठिकाणी ९०५ केंद्रे ऊभारण्यात आली आहेत. सुरुवातील शिवभोजन थाळीचे दर १० रु. होते. कोरोनाच्या उद्भवलेल्या समस्येनंतर २९ मार्च २०२० पासून या थाळीचे दर ५ रु. करण्यात आले. शिवभोजन थाळी ही गरजूंसाठी अन्नपूर्णेची थाळी ठरत असल्याचे या ट्वीटवर सांगण्यात आले आहे.