अवकाळी पावसामुळे यंदा कांद्याचे रोपही मिळेना
यंदा संपूर्ण वर्षे लहरी हवामानाचा फटका शेतक-यांना बसला आहे. हळवी कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, येत्या काही दिवसांत कांद्याच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी लोकमतला सांगितले.
सध्या हळवी कांद्यााचा (लाल कांदा) हंगाम अंतिम टप्प्यात आल्यामुळे या कांद्यााची आवक कमी झाली असून, परिणामी बाजारात कांद्यााचा तुटवडा निर्माण झाला आहे. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कांदा दरात तेजी सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्यााची विक्री ५० ते ६० रुपये दराने केली जात आहे.
गरवी कांद्याची आवक अल्प प्रमाणात सुरू असल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून बाजारात कांद्यााचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कांदा दरात वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत बाजारात होणारी गरवी कांद्यााची आवक कमी असल्याचे पोमण यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षी झालेल्या अवेळी पावसामुळे कांद्यााचे मोठे नुकसान झाले. कांदा बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याने लागवडीवर मोठा परिणाम झाला. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारात दररोज 170 ते 220 ट्रक कांदा विक्रीस पाठविला जात होता.
पुणे, नाशिक, वाशी या महत्त्वाच्या बाजार आवारात पुणे जिल्हा, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तसेच नाशिक परिसरातून हळवी कांद्यााची आवक होत आहे.किरकोळ बाजारात एक किलो कांद्यााची विक्री ५० ते ६० रुपये दराने केली जात आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत असून, कांद्याचे दर आणखी वाढू शकतात.