128 कोटी रुपयांच्या विकास कामांच ऑनलाईन उद्घाटन व भूमिपूजन सोहळा संपन्न

7

आज इंदापूर तालुक्यात 128 कोटी मंजूर झालेल्या विकास कामांचे ऑनलाइन पद्धतीने उदघाटन व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. असा सोहळा संपन्न होण्याची इंदापूर तालुक्याची ही पहिलीच वेळ होती.

तालुक्यात आज आठ ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमास निमगाव केतकी येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः उपस्थिती दर्शवली,तर वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य व विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तेथील स्थानिक भूमिपूजने करण्यात आली.

हा कार्यक्रम सुरू असतानाच भरणे यांनी या ऑनलाईन कार्यक्रमास पवार साहेब नाहीत, ते असायला हवे होते. अशी इच्छा व्यक्त केली व खासदार सुप्रिया सुळे यांनी काही क्षणातच त्यांची ही इच्छा पूर्ण केली.

त्यानंतर शरद पवार देखील ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले.कोणत्याही परिस्थितीत विकासकामांचा वेग थांबता कामा नये यासाठी कोरोनाच्या काळात गर्दी न होता तसेच कुठल्याही कामाला विलंब लागू नये म्हणून त्यांनी ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब केला.हा कार्यक्रम भरणे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यात आठ ठिकाणी झाला.