२३ एप्रिल नंतरच दहावी-बारावीच्या ऑफलाईनच परीक्षा

2

दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी-मार्चपासूनच सुरू होते .परंतु कोरोनामुळे यंदाच्या परीक्षा २३ एप्रिल नंतरच ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

दहावी-बारावीच्या विषयांची संख्या मोठी असते. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्य मानले जाते. कोरोनामुळे १५ जून ऐवजी २३ नोव्हेंबर पासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. त्याअगोदर ऑनलाइन शिक्षण देण्यात आले आहे .आत्ता २३ एप्रिलपर्यंत वर्ग सुरू राहणार असून त्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.नववी ते बारावीपर्यंतच्या २५ हजार ८६६ पैकी ९५० हजार शाळा सुरू झाल्या आहेत .५९ लाख २७ हजार ४५६ पैकी चार लाखांपर्यंत विद्यार्थ्यांनि शाळेत हजेरी लावली आहे.

बहुपर्यायी प्रश्नपत्रिकांद्वारे परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. मे महिन्यातील उन्हाळा आणि जून मधील पावसाळ्याचा अंदाज पाहता ही परीक्षा ऑफलाईनच घेतली जाणार आहे. त्यामुळे एक ते दीड महिना उशिराने दहावी-बारावीची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत असून जानेवारीत बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर होईल असे सांगण्यात आले आहे. २३ एप्रिलनंतर परीक्षा घेण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.