‘पेपरवर लिहून देतो ऑपरेशन लोटस होणार नाही’

14

पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत लढल्याने भारतीय जनता पार्टी ला आपल्या हक्काच्या नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भाजपावर आता सर्व पक्षांकडून टीका होत आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही. हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूर एवजी मुंबईत राहत असल्याने त्यांचं नागपूर वरचं लक्ष कमी झाल्याचं सुद्धा मुश्रीफ यांनी म्हटलंय. यामुळे त्यांच्या हातातून एक गड सुटताना पाहायला मिळतोय.

बॅलेट पेपर असल्यावर निवडणुकीचा निकाल काय लागू शकतो हे या निवडणुकीने दाखवून दिले. आता चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे काश ईव्हीएम होता असे म्हणत असतील. अशी बोचरी टीका सुद्धा हसन मुश्रीफ यांनी केली.