भाजप नेते राजे समर्जीतसिंग घाटगे यांनी शिवार संवाद कार्यक्रमांतर्गत महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यां विषयी प्रश्न विचारत सरकारला धारेवर धरले आहे.या वेळी राजे समर्जीत सिंग यांनी सांगितले की, अपयश लपवण्यासाठीच विरोधक आज कृषी विधेयकावर टीका-टिप्पणी करत आहेत.
यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्ष उमेश देसाई, मनसेचे तालुकाध्यक्ष आनंदराव गुरव, भिकाजी तिप्पे, सागर मोहिते, दिलीप तिप्पे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी चिकोत्रा परिसरातील असंख्य शेतकरी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. विविध राज्यातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कांची पै न पै मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. गेले महिनाभर मी ‘शिवार संवाद’कार्यक्रमांतर्गत विविध गावांत भेटून शेतकऱ्यांशी संवाद साधतोय. जोपर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांचे हक्क त्यांना देत नाही तोपर्यंत मी झोपलेल्या या राज्य सरकारला उठवण्याचा प्रयत्न करत राहीन,गेले एक महिना मी ह्या राज्य सरकारला वीजबिल माफी, शेतकऱ्यांसाठी अनुदान प्रोत्साहन याबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न करतोय पण अजूनही या सरकारला जाग आलेली नाही. परंतु मी थांबणार नाही.अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते राजे समर्जीतसिंग घाटगे यांनी दिलीय.