800 वर्षांनंतर होणाऱ्या गुरू-शनीचे मिलन पाहण्याची बारामतीकरांना संधी

35

४ मार्च १२२६ नंतर म्हणजेच तब्बल ८०० वर्षानंतर २१ डिसेंबर २०२० रोजी गुरु आणि शनी ग्रहाची अनोखी युती आकाशा मध्ये सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे रात्री ९ वाजून १५ मिनिटापर्यंत पाहता येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयामध्ये पदार्थ विज्ञान व खगोलशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर यांनी दिली आहे.

गुरु व शनि या दोन ग्रहांचे अवकाशातील मिलन पाहण्याची संधी बारामतीकरांना मिळणार आहे. अत्यंत दुर्मिळ असा योग समजला जाणारी ही घटना येत्या 20 ते 22 डिसेंबरच्या रात्री अवकाशात अनुभवता येणार आहे. हे दृश्य ‘स्टारट्रेक’ टेलिस्कोप द्वारे बारामतीकरांना पाहण्याची संधी येथील पोलस्टार कॅपिटल इन्व्हेस्टमेंटस् चे मयुर शहा व पुण्यातील आकाश निरिक्षक व खगोलतज्ञ विवेक शिळिमकर यांनी विनामूल्य उपलब्ध केली आहे.

आकाशामध्ये सूर्य मावळल्यानंतर पश्‍चिमेकडे रात्री नऊ वाजून १५ मिनिटांपर्यंत हा आविष्कार पाहता येणार आहे. या दिवशी सूर्य हा आयनिक वृत्तावरून फिरताना जास्तीत जास्त दक्षिणेकडे सरकतो. येत्या 23 तारखेपर्यंत दररोजल सूर्यास्तानंतर तासभर पश्‍चिम क्षितीजावर हे ग्रह पाहता येणार आहेत. तेंव्हा या दोन्ही ग्रहांमधील अंतर 735 दशलक्ष किलोमीटर इतके असेल. रविवारी संध्याकाळी साडेपाच ते रात्री आठ पर्यंत भिगवण रोड वरील ‘सिकची आयकॉन’ बिल्डिंगच्या टेरेसवर होणार आहे. कोरोनाचे सर्व नियम व अटी पाळून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.