डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अॉनलाईन निबंध, वकृत्व स्पर्धेचे आयोजन

10

गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षिदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर कोरोनाचे सावट आहे. मात्र अॉनलाईन पद्धतीने विविध कार्यक्रम घेऊन जयंती साजरी करण्याचा मानस विविध संघटनांनी दाखवला आहे. या पार्श्वभूमिवरच वाशिम जिल्ह्यात सामाजिक आणि शैक्षणिक ऊपक्रमांत अग्रेसर असणार्‍या राजा प्रसेनजीत अल्पसंख्याक शिक्षण संस्था आणि नेहरु युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने अॉनलाईन निबंध व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतिनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये वकृत्व स्पर्धेसाठी दोन विषय तर निबंध स्पर्धेसाठी दोन विषय देण्यात आले आहे. यापैकी एका विषयावर आपले साहित्य सादर करायचे आहे. वकृत्वाचा ५ मि. 7507271542 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायचा आहे, तर २५० ते ३०० शब्द‍ांचा निबंध 7447212475 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायचा आहे. सबंद्धित साहित्य पाठवण्यासाठी  १५ एप्रील ही अंतिम तारीख असणार आहे.

दरवर्षी मोठ्या ऊत्साहाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते. विविध सांस्कृतीक कार्यक्रम तसेच भव्य मिरवणुकांचे आतोजन केले जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जयंतीवर कोरोनाचे सावट आहे. परिणामी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून सरकारने जाहीर केलेल्या सर्व नियमावलींचे पालन करीत बाबासाहेबांना अभिवादन करीत जयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निबंध आणि वकृत्व स्पर्धा हे वैचारीकतेत भर घालणारी ठरत असते. त्यामुळे या जल्हास्तरीय स्पर्धेत अधिकाधिक व्यक्तींनी सहभागी होऊन स्पर्धेस प्रतिसाद देण्याचे आवाहन नेहरु युवा मंडळाचे प्रदिप पट्टेबहाद्दुर यांनी केले आहे.