अन्यथा ससून रुग्णालयाच्या प्रांगणात बेड्स लावण्याची वेळ येईल : उपमुख्यमंत्र्याचा इशारा

56

पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. लोक गांभीर्याने घेत नाहीत. रस्त्यावर लोक पोलिसांशी हुज्जत घालतात. बहुतांश लोक नियमांचे पालन करीत नाहीत. 

नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचे पालन करावे. अन्यथा ससून रुग्णालयाच्या प्रांगणात बेड्स लावण्याची वेळ येईल. ती वेळ येऊ देऊ नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

 रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजनची कमतरता भासणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. इतर आजारांच्या रुग्णांसाठी स्वतंत्र नॉन कोविड रुग्णालय ठेवण्यात यावीत. त्याबाबत नागरिकांना माहिती द्यावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

एखाद्या घरात कोरोना रुग्ण असेल, तर त्या घरातील लोक गावभर फिरतात. याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन पवार यांनी केलं आहे.