अन्यथा संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडेल व कठोर ‘लॉकडाऊन’शिवाय इलाज राहणार नाही : अशोक चव्हाण

25

नांदेड येथील २०० खाटांचे जंबो कोविड सेंटर आजपासून (सोमवारी ता. १९) कार्यरत होणार आहे. तिथे ऑक्सिजनची सुविधा देखील उपलब्ध असेल.नागरिकांनी ‘लॉकडाऊन’ला गांभिर्याने घेतले नाही तर कठोर ‘लॉकडाऊन’ लागू करण्याशिवाय राज्य सरकारकडे इलाज राहणार नाही, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.

पुढील काळात येणारे श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, महाराष्ट्र दिन, ईद आदी सण- उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती- पुण्यतिथीला सुद्धा नागरिकांनी गर्दी न करता घरी राहूनच आपली श्रद्धा व्यक्त करावी, अशीही विनंती अशोक चव्हाण यांनी केली.

रविवारी (ता. १८) सकाळी समाजमाध्यमांवरुन जिल्ह्यातील नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते.कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी करायचे असेल तर तूर्तास ‘लॉकडाऊन’चे काटेकोर पालन हाच पर्याय आहे. अन्यथा संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडेल व कठोर ‘लॉकडाऊन’शिवाय इलाज राहणार नाही, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.