अन्यथा अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करु : ‘या’ भाजप नेत्याचा इशारा

98

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा भाजप नेते दिलीप खैरे यांनी दिला आहे.भाजप नेते दिलीप खैरे यांनी याबाबत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले आहे.

बारामती तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट राजकीय व्यक्ती व संस्था यांच्या हाती एकवटली आहे. तालुक्यातील निवडक मंडळींसाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन राबत असल्याचे चित्र दुर्दैवाने तयार झाले आहे.

 ज्या पद्धतीने आरोग्य व्यवस्था व प्रशासनाचे केवळ शहरात तेही काही ठराव व्यक्ती पदाधिकायांच्या हाती केंद्रीकरण झाले आहे ते पाहता तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील सर्वसामान्यांना कोणी वाली नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाल्याचे खैरे म्हणाले.

आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट लोकांच्या हाती गेली आहे. खरेतर ही राजकारण करण्याची वेळ नाही अथवा आरोग्यव्यवस्था पुरवताना दुजाभाव करण्याची ही वेळ नाही. तसेच प्रशासनाने प्रत्येक मंडलात कोरोना चाचणी केंद्रे उभारावीत, अशी मागणी यांनी केली आहे.