…नाहीतर कंत्राटदारांची बिलं रोखनार; नितीन गडकरींनी दिली तंबी

74

नितीन गडकरी यांना कामाच्या बाबतीत कुठलीच हायगय केलेली जमत नाही. ते कामाच्या बाबतीत कडक स्वभावाचे असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळतं. आता त्यांनी कंत्राटदारांना इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या शिस्तीच्या स्वभावाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

कोणत्याही महामार्गाची उभारणी करताना रस्त्यालगत झाडे न लावणाऱ्या कंत्राटदारांची बिलं रोखण्यात येतील, असा स्पष्ट इशारा केंद्रीय भूपृष्ठ आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.

महामार्गाच्या प्रकल्पात रस्त्यालगत झाडे लावण्याच्या अटीचा समावेश करण्यात आला आहे. सदरील नियम रस्त्यांच्या कंत्राटदारांसाठी बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या कंत्राटदारांची बिलं रोखा, अशा सूचना नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत.

महामार्गावर आणि इतर कामावर देखरेख ठेवण्यासाठी महामार्गाच्या कामाचे इ टॅगिंग आणि चित्रीकरण करून ठेवण्यात यावे, असे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.