गेल्या काही दिवसांपासून यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत शिवसेनेकडून संजय राऊत वेळोवेळी सूचना देत आहेत. संजय राऊत यांनी केंद्रातील यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असं म्हटलं होतं.
तर दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाण म्हणतात, शिवसेनेशी आमची आघाडी केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असून, राज्यातील आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर झाली आहे. असे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे.
किमान समान कार्यक्रम प्रमाण मानून काँग्रेसने आघाडीचा महाराष्ट्रापुरता निर्णय घेतलेला आहे. शिवसेना अजूनही यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा सल्ला शिवसेनेने देणे उचित नाही, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांना फटकारले आहे.