एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय; शरद पवारांनी ‘या’ नेत्याला मारला टोला

214

राष्ट्रवादीचे माजी नेते मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. वैभव पिचड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण लहामटे यांनी विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव केला होता.

शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात माजी आमदार कै.यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.

पवारांचे जुने सहकारी असलेले मधुकर पिचड यांना आपल्या शैलीत चिमटे काढले. एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे, असा टोला शरद पवार यांनी मधुकर पिचड यांना लागवला आहे.

अकोले तालुक्यातील जनतेने आम्हाला साथ दिली आणि ती अशीच पुढेही द्यावी, असं आवाहन शरद पवार यांनी केले. या भागातील सर्व नेते एकजुटीने सोबत आले. मी सर्व गोष्टी केल्या मात्र एक दीड वर्षापासून आमच्या‌ अनेक सहका-यांच्या अंगात यायला लागलं, असा टोला शरद पवार यांनी पीचड यांना लगावला आहे.