कॅन्सरवर मात करत संजय दत्त शूटिंगसाठी सज्ज!

3

बॉलीवुडचा संजुबाबा याने अलीकडेच कर्करोगावर मात केली आहे. आता त्याच्या फिटनेसवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यानंतर संजुबाबाचा अनोखा लूक समोर आला आहे. संजय दत्त यांच्या तब्येतिचा विचार करता आगामी चित्रपटामध्ये त्यांचे अँक्शन सीन कमी असतील अशी चर्चा सुरू आहे. निर्मात्यांना याबाबत भिती वाटत होती. परंतु नेहमी वाईट काळात त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. याही वेळी संजय दत्तने पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे.

एका वृत्तानुसार, या चित्रपटात संजय दत्तचे कोणतेही सीन एडिट केले जाणार नाहीत. त्यांना सगळे सीन करायचे आहेत. त्यांनी याबाबत खूप हिंमत दाखवली आहे. त्यामुळे फिल्मसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. संजय दत्त त्याच्या फिटनेसवर खुप लक्ष देत आहे. प्रत्येक सीन मध्ये त्यांनी जीव तोडून काम केले आहे. केजीएफ 2 मध्ये भूमिका साकारणारा संजय दत्त यांची खूप प्रशंसा होत आहे.

संजय दत्त लवकरचं KGF 2 मध्ये दिसणार आहे. तसेच सडक 2 आणि मुंबई सागा अशा काही सिनेमात दिसणार आहेत. याशिवाय भुज द प्राईड ऑफ इंडियामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत संजय दत्त दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.