औरंगाबादकरांची ‘ही’ आवडती जागा बनणार ऑक्सिजन हब, झकास पठार !

30

औरंगाबाद शहरातील भावसिंगपुरा परिसरातील गोगाबाबा टेकडीवर जागतिक पर्यावरण दिनी (05 जून) सुमारे 6 हजार 250 देशी प्रजातींची रोपे जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत. यामुळे हा भाग ऑक्सिजन हब बनेल.

तसाताऱ्यातील कास पठाराच्या धर्तीवरच विविध फुलांच्या रोपांची लागवड टेकडी परिसरात करून हा भाग झकास पठार करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाचा असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी 5 जून रोजी वृक्ष लागवड कार्यक्रमात कोरोना विषाणूच्या सर्व नियमावलींचे पालन करत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या रोपांचे तीन वर्ष संवर्धन शासनामार्फत करण्यात येणार असून वृक्षांच्या संवर्धनासाठी तारांचे कुंपन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून हे काम होणार आहे.

सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर झकास पठार तयार करण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. जिल्हा परिषदेतील अधिकारी कास पठार येथे भेट देऊन तेथील विविध प्रजातींची लोभनीय फुलांची रोपे, बी आणणार असल्याचेही ते म्हणाले.