परळीच्या औष्णीक वीजनिर्मिती केंद्रातील ऑक्सीजन प्लांट परभणीत शिफ्ट होणार…

17

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांमधून ऑक्सीजनची कमतरता भासू नये म्हणून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतलेल्या पुढाकारातून परभणीत परळीच्या औष्णीक वीजनिर्मिती केंद्रातील ऑक्सीजन प्लांट लवकरच परभणीत शिफ्ट होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित आहे. परंतु संभाव्य स्थितीत ऑक्सीजनची कमतरता भासू नये, या दृष्टीकोनातून विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी परळी वैजनाथ येथील औष्णीक वीजनिर्मिती केंद्रातील ऑक्सीजन प्लांट परभणीत स्थलांतरीत करण्याबाबत उच्चपातळीपर्यंत प्रयत्न केले.

परभणीत येत्या दहा ते 12 दिवसात तो प्लांट स्थलांतरित होईल, असे संकेत आहेत. या प्लांटचे वैशिष्ट्य म्हणजे हवेतुन ऑक्सीजन निर्मिती याव्दारे होणार आहे. त्यामुळे हा प्लांट आपत्कालीन स्थितीतील रुग्णांच्या दृष्टीने संजीवनी देणारा ठरणारा आहे.