आत्ता एसटीचे ड्रायव्हर आणणार ऑक्सिजन टँकर : अनिल परब

25

ऑक्सिजनचा राज्यात तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे केंद्राकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.रेल्वेकडून ऑक्सिजन एक्सप्रेस सोडली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पण, राज्य सरकारला ऑक्सिजन आणण्यासाठी ड्रायव्हर मिळत नसल्याची बाब उघड झाली आहे.

राज्य सरकारला ऑक्सिजन आणण्यासाठी ड्रायव्हर मिळत नसल्याची बाब उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटीचे ड्रायव्हर ऑक्सिजन टँकर आणतील, अशी माहिती दिली.

लॉकडाऊनमुळे टँकर्स ड्रायव्हर गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून परिवहन विभागाचे ड्रायव्हर्स ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

ज्या गोष्टी केंद्र सरकारच्या हाती आहेत, त्याची मागणी केंद्र सरकारकडेच केली जाणार. दुसरीकडे कोणाला मागणार, असा खोचक सवाल परब यांनी यावेळी विचारला.