पडळकरांचे ठाकरेंना खरमरीत पत्र, आदित्य ठाकरेंना जसं तातडीने मंत्रिपद दिलं तसं बहुजनांच पालकत्व स्वीकारा

8


सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं. त्यामुळे मराठा समाजातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे.

मराठा आरक्षण प्रश्नांवर सध्या राज्यात सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार, नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

उद्धव ठाकरेंनी ज्याप्रमाणे आदित्य ठाकरेंना तातडीने मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

मराठा आरक्षण रद्द होण्याला महाविकासआघाडी जबाबदार आहे. बाकीच्या समाजाचं काय? इतर भटक्या, मागासवर्गीय, अनुसुचित जाती व जमातींमधील युवकांच्या आयुष्याशी खेळलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.  मागासवर्गीय, NT, SC, ST प्रवर्गातील 365 युवकांना अजून नियुक्ती मिळणं गरजेचं आहे. त्यांचा उद्रेक झाल्यास महाविकास आघाडी सरकारच पाप असेल, असा इशाराही गोपीचंद यांनी दिला आहे.