पद्मविभूषण शास्त्रज्ञ रोद्दम नरसिम्हा यांचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन

11

प्रसिद्ध अवकाश शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषणने गौरवण्यात आलेले रोद्दम नरसिम्हा यांचे निधन झाले आहे. ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे नरसिम्हा यांना ८ डिसेंबर रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते

नरसिम्हा यांची राष्ट्रीय एरोस्पेस लॅबोरेटरीज (एनएएल) चे संचालक म्हणूनही निवड झाली होती. यासह नरसिम्हा यांनी तेजस या लढाऊ विमानाची डिझाईन करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. केंद्र सरकारने नरसिम्हा यांना अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रातील योगदानासाठी २०१३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

वयाच्या ८७ वर्षी त्यांनी सोमवारी खासगी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्यांना रूग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांची प्रकृती अतिशय नाजूक होती. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होत होता. त्यांना २०१८ मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता.त्यांनी जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्सड सायंटिफिक रिसर्च (जेएनसीएएसआर) मध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. त्यांच्यावर अंतिम संस्कार आज दुपारी करण्यात येणार आहे.