पंढरपूर पोटनिवडणूक : भगीरथ भालके विरुद्ध समाधान औताडे यांच्यात सरळ लढत

70

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून स्वर्गीय भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर भारतीय जनता पार्टीकडून समाधान औताडे यांनी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये सरळ लढत होत आहे.

भारत भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे पंढरपूर विधानसभेची पोट निवडणूक होत आहे. सोमवारी भाजपने औताडे यांनी उमेदवारी जाहीर करताच, राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

महविकास आघाडीसह शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनही अर्ज दाखल करण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम यांच्यासह अनेक अपक्ष आपले नशीब अजमावत आहेत.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार याबद्दल आडाखे मतदारांकडून बांधले जात आहेत. भालके यांच्यासोबत वडिलांच्या अकाली मृत्युमुळे तयार झालेल्या सहानभुतीची लाट आहे. त्या लाटेचा औताडे कसा सामना करतात हे पाहणं औतसुक्याचं ठरेल.