पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणुकीत नवा ट्विस्ट, नितीन मानेचा आणि राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही !

112


पंढरपूर निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाचे उमीद्वार संधान अवताडे यांनी बाजी मारली असून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना पराभव पत्करावा लागला आहे आमदार भारत भालकेंच्या निधनानंतर पंढरपूरात पोटनिवडणूक घेण्यात आली. मात्र या निवडणुकीनंतर सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलने ही पोटनिवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करणारं पत्र फिरू लागलं होत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं या बातमीवर खुलासा केला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसनं निवेदन प्रसिद्ध करत म्हटलंय की, अँड नितीन माने या नावाचा व्यक्ती स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लीगल सेलचा महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य असल्याचं भासवत असून त्याचे लेटर हेडदेखील बनविले आहे. त्या लेटरहेडचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेलच्या नावाचा गैरवापर करून विविध निवेदन आणि तक्रारी देत आहे. मात्र अँड. नितीन माने, मुंबई याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेलशी काहीही संबंध नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.


नितीन माने यांना कोणतंही नियुक्तीपत्र देण्यात आलं नाही. त्याने दिलेल्या कोणत्याही निवेदनाशी अथवा तक्रारीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेलचा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेलचा पदाधिकारी या नात्याने त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये आणि पत्रव्यवहार करू नये असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष अँड आशिष पंजाबराव देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे पंढरपूर पोटनिवडणूक पुन्हा घेण्यात यावी ही राष्ट्रवादी पक्षाची मागणी नसल्याचं स्पष्ट झालं आहे.