महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंढरपुरात सभा घेणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. गुरुवारी म्हणजेच आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
गेले 12 दिवस आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात खरी लढत होत असली, तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शैला गोडसे व सिद्धेश्वर आवताडे यांच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली आहे
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे भगीरथ भालके, भाजपचे समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत.