मराठवाडा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकित भाजपा नेत्या पंकजा मुंडे या प्रचाराच्या रिंगणात उतरल्या होत्या. भाजप उमेदवाराचा मोठा प्रचार त्यांनी केला. प्रचारानंतर पंकजा मुंडे या स्वत: विलगीकरणात गेल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात त्यांनी ट्वीट करून माहिती दिली होती.
यानंतर पंकजा मुंडे यांच्या तब्येतीबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यकर्ते चिंतेत होते. मात्र, पंकजा मुंडे यांनी कोरोन चाचणी केली असता. त्याचा अहवाल आला आहे. हा अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यांना कोरोना नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे निश्चिंत झाल्या आहेत.
स्वतः पंकजा मुंडेंनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ‘माझी कोविड-19 (covid-19) ची टेस्ट निगेटिव्ह आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या काळजी व्यक्त केली त्यांचे आभार.’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही.