भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात. त्यांचा सोशल मीडियावरही फॅन फॉलोविंग खूप आहे. सध्या व्हेकेशन मूडमध्ये आहेत. त्यांनी मुलगा आणि पतीसोबत महाबळेश्वरची छोटी टूर केली आहे. याबाबतचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पंकजा मुंडे यांनी या टूरच्या निमित्ताने आलेले काही अनुभव देखील शेअर केले आहेत.
लोकांनी गाडी थांबवून फोटोसाठी केलेली विनंती, लोकांच्या प्रेमाचा, आग्रहाचा किस्सा पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. विविध कार्यक्रमाला गेल्यावर उपस्थित राहिल्याचे आणि मान्यवरांना भेटल्याचे त्या नेहमी शेअर करत असतात. व्हेकेशन मूडमध्ये पंकजा मुंडे या त्यांच्या कुटुंबियांसोबत महाबळेश्वरला हवापालट करायला गेल्या होत्या. पती आणि मुलांसोबत त्यांनी महाबळेश्वरमधील थंड हवेचा आनंद घेतला.
पंकजा मुंडे या आपल्या दौऱ्यात आलेले अनुभव सोशल मीडियातून मांडले आहेत. आजही त्यांनी ड्रायव्हर असलेल्या एका चाहत्याचा अनुभव ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे. ट्विटमध्ये पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, “लोकांच्या प्रेमाचा परिचय कसा येतो, याचा काही अंदाज बांधता येत नसतो. पण, मला सुदैवाने असा अनुभव सदैव येतो. दोन दिवस हवा बदल म्हणून मी, पती आणि मुलासमवेत महाबळेश्वर येथे गेले होते. तेथून परत येताना रस्त्यात नेहमीप्रमाणे लोकांनी हात करून गाडी थांबवली.”
“लोंढे नावाचे ड्रायव्हर होते. त्यांनी अगदी भावूक होऊन माझ्या कार्यक्रमाची इत्यंभूत माहिती, ते कशी ठेवतात, हे सांगितले. अगदी माझ्या पोस्ट ते किती आपुलकीने लाइक करतात, हेही आवूर्जन सांगितले. तितक्यात गाडीतील विद्यार्थी खाली उतरले. बाजूच्या बसमधील प्रवासीही उतरले. या सर्वांनी माझ्यासोबत फोटो काढले. गाडीत बसलेला माझा मुलगा कौतुकाने हे सर्व बघत होता,” असे पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहले आहे.