दसऱ्याच्या दिवशी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत मेळावा घेतल्या प्रकरणी माजी मंत्री पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यासह तीन आमदार, खासदार आणि अन्य ५५ जणांवर अंमळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांनी सालाबादप्रमाणे यावर्षीही दसरा मेळावा आयोजित केला होता. हा मेळावा ऑनलाईन होता. तरीही मुंडे समर्थकांनी सावरगाव घाट याठिकाणी मोठी गर्दी केली. त्यामुळे जमावबंदी कायद्याचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पंकजा मुंडे यांच्यासह माजी मंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर, व इतर ५० जणांवर गुन्हा अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.