परभणी : नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तब्बल ‘इतके’ कोरोना रुग्ण

5

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज जिल्ह्यात तब्बल 436 कोरोनाबाधीत आढळले असून नऊ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला. तर 263 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

रुग्णालयातील कक्षात तीन हजार 341 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 460 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 17 हजार 262 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 13 हजार 461 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.

रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 84 हजार 789 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 66 हजार 941 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 17 हजार 114 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 594 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.